झेडपी-टीपी निवडणुकीच्या तयारीला वेग; डॉ. अंजली निंबाळकर यांनी बोलावली खानापूर काँग्रेसची बैठक

झेडपी-टीपी निवडणुकीच्या तयारीला वेग; डॉ. अंजली निंबाळकर यांनी बोलावली खानापूर काँग्रेसची बैठक

खानापूर : प्रतिनिधी

जिल्हा पंचायत (झेडपी) आणि तालुका पंचायत (टीपी) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यात काँग्रेस पक्षाने तयारी सुरू केली आहे. खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी खानापूर काँग्रेसची बैठक बोलावली आहे.

ही बैठक मंगळवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता खानापूर येथील दुर्गानगरमधील रायगड निवासस्थानी होणार आहे. या बैठकीत झेडपी-टीपी निवडणुकांच्या अनुषंगाने पक्षाची रणनीती, इच्छुक उमेदवार तसेच निवडणुकीच्या तयारीबाबत पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, महिला आणि युवकांशी चर्चा केली जाणार आहे.

दरम्यान, झेडपी-टीपी निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ब्लॉक काँग्रेस अध्यक्षांकडे आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे. इच्छुकांनी आपले नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, इच्छुक असलेल्या झेडपी किंवा टीपी मतदारसंघाचे नाव तसेच थोडक्यात परिचय अथवा बायोडाटा अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. हे अर्ज आठ दिवसांच्या आत जमा करण्याचे कळविण्यात आले आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांची माहिती संकलित करणे आणि पक्षांतर्गत चर्चा घडवून आणणे, या दृष्टीने या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. खानापूर तालुका काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांनी बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. अंजली निंबाळकर यांनी केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fourteen − four =

error: Content is protected !!