ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न; ५५ जणांचा सहभाग

ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न; ५५ जणांचा सहभाग

बेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्याकिरण सेवा केंद्र व तारांगण या संस्थांतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारपेठ, टिळकवाडी येथील डॉ. नीता देशपांडे डायबेटिस सेंटर येथे पार पडलेल्या या शिबिराचा जवळपास ५५ ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला.

डॉ. नीता देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सेट्रा केअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे डॉ. लक्ष्मी कुलकर्णी, मेघना होसमठ आणि शीतल सावी यांनी मधुमेह व रक्तदाब तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला. तसेच एस. एम. जोशी कोडकणी आय सेंटरतर्फे डॉ. राम तुरमुरी आणि डॉ. नेहा यांनी नेत्रतपासणी केली. डोळ्यांची योग्य काळजी कशी घ्यावी, याबाबतही त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले. जनसंपर्क अधिकारी यशवंत जोशी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.

आरोग्य तपासणीसोबतच शिबिरात मनोरंजनाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. सतीश देशपांडे यांनी प्रार्थना सादर केली. त्यानंतर विजय बांदिवडेकर, वनिता जोशी, विजय वाईगडे, पी. एन. रायबागी, सुरेंद्र व योगिनी देसाई, रवींद्रनाथ व स्नेहलता जुवळी, रवींद्रनाथ कुंभोजकर, उल्हास पानसे, बाळकृष्ण बिर्जे, नारायण कोरडे आणि नारायण बाळेकुद्री यांनी हिंदी, मराठी व कन्नड गीते, अभंग आणि भावगीते सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले.

आरोग्य तपासणी आणि सांस्कृतिक कार्यक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी हा उपक्रम उपयुक्त व आनंददायी ठरला. विठ्ठल पोळ यांनी आभार मानले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × five =

error: Content is protected !!