बेळगाव : प्रतिनिधी
जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा २०२६-२७ मध्ये Shotokan Karate Academy Belgaumच्या तीन विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत पदकांची कमाई केली असून, तिन्ही विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
श्रीनाथ एम. गिऱ्याळकर याने U-17 मुलांच्या 40 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळवले. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
रोही आर. पाटील हिने U-14 मुलींच्या 26 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. तसेच रुद्र जे. हिरेमठ याने U-14 मुलांच्या 35 किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवले. या दोघांचीही राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तिन्ही खेळाडूंना मास्टर कृष्णा जाधव यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभत आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल प्रशिक्षक, पालक आणि क्रीडाप्रेमींकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतही तिन्ही खेळाडूंनी उत्तम कामगिरी करावी, यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
