बेळगाव | बेधडक बेळगाव वृत्तसेवा
लोकमान्य ग्रंथालयाच्या वतीने मंगळवार, ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ख्यातनाम अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांचे ‘आजची गुंतवणूक’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
आजच्या अस्थिर आर्थिक परिस्थितीत कष्टाने कमावलेली बचत योग्य पद्धतीने आणि विचारपूर्वक कुठे व कशी गुंतवावी, याबाबत चंद्रशेखर टिळक मार्गदर्शन करणार आहेत.
हे व्याख्यान वरेरकर नाट्य संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले असून सर्वांसाठी खुले आहे. गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाबाबत मार्गदर्शन घेऊ इच्छिणाऱ्यांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
