बेवारस मृतदेहावर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार

बेवारस मृतदेहावर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार

बेळगाव | बेधडक बेळगाव वृत्तसेवा

बेळगावातील व्हानिता विद्यालयाजवळील कॉलेज रोड बसस्थानक परिसरात काही दिवसांपूर्वी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. मृताची ओळख पटली नाही तसेच त्याचे नातेवाईक किंवा कुटुंबीय अंत्यसंस्कारासाठी पुढे न आल्याने मृतदेह शवागारात ठेवण्यात आला होता.

या घटनेची माहिती मिळताच सोशल रेस्क्यू टीमने पुढाकार घेत मृत व्यक्तीवर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था केली. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेऊन धार्मिक विधीनुसार सन्मानाने अखेरचा निरोप देण्यात आला.

या सामाजिक कार्यासाठी विकी मेहता, अॅलन विजय मोरे आणि अवधूत तुडवेकर यांनी पुढाकार घेतला. तसेच कॅम्प पोलीस ठाण्याचे एएसआय लक्ष्मण पाटील, कॅम्प पोलीस कर्मचारी आणि शववाहिका वाहनाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

नातेवाईक किंवा कुटुंबीय नसतानाही या अनोळखी व्यक्तीला माणुसकीच्या भावनेतून सन्मानपूर्वक अखेरचा निरोप देत सोशल रेस्क्यू टीमने सामाजिक बांधिलकी जपली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twenty + 13 =

error: Content is protected !!