श्रींगरी कॉलनीत विविध सामाजिक उपक्रमांनी गणेशोत्सव उत्साहात

श्रींगरी कॉलनीत विविध सामाजिक उपक्रमांनी गणेशोत्सव उत्साहात

बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्रींगरी कॉलनी, बाडीवाले कॉलनी व टीचर्स कॉलनी यांच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

गणेशोत्सवानिमित्त महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सौ. प्रीती पाटील, बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर प्रीती कामकर तसेच एंजल फाऊंडेशनच्या मीनाताई बेनके यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात सुमारे ७५० महिलांनी सहभाग घेतला.

उत्सव काळात सत्यनारायण महापूजा, विष्णुसहस्रनाम जप, अन्नपूर्णेश्वरी मंत्रजप आणि गणपती महाआरती यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी समाजसेवक विनायक कामकर, प्रवीण पिळणकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

लहान मुलांसाठी ‘फिट इंडिया, स्ट्राँग इंडिया’ या संकल्पनेतून वॉकिंग रॅली व रनिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तसेच कॅरम, बुद्धिबळ, क्रिकेट, फुटबॉल, चित्रकला, नृत्य व गायन स्पर्धांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

गणेश विसर्जन मिरवणुकीला मंडळाचे अध्यक्ष विनायक काकतीकर व सौ. विजेता काकतीकर यांच्या हस्ते श्रींची पूजा करून सुरुवात करण्यात आली. मोरया ढोल-ताशांच्या गजरात कॉलनीतील प्रमुख मार्गावरून गणेशमूर्तीची मिरवणूक काढण्यात आली.

यंदाची गणेशमूर्ती मंडळाला उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री. संतोष श्रींगारी यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. गणेशोत्सव काळात समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मंडळाला भेट देऊन उपक्रमांना सहकार्य केले. यामध्ये समाजसेवक दत्ता जाधव, चंद्रकांत कोंडुस्कर, उद्योगपती सुरेश वीरनगौडर, प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर, आरएसएसचे श्री. रेवणकर, रणजित मनोळकर, श्री. परागी यांच्यासह अन्य मान्यवरांचा समावेश होता.

हे सर्व धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे स्वागताध्यक्ष ॲड. शिवकुमार उडकेरी, श्री. तुकाराम शिंदे, परमपूज्य गणपत वडेर गुरुजी, श्री. जोशी गुरुजी, सूर्यकांत हिंडलगेकर, विश्वनाथ येळुरकर, संतोष श्रींगरी, शंकर कांबळे, सोहम हिंडलगेकर, अनिश पोटे, प्रणय हनगोजी, व्यंकटेश सातपुते, चंद्रकांत सावंत, अनिल अणवेकर, सुरेश उदनुर, जगदीश बडिगेर, विश्वनाथ काकडे, जयेश भातकांडे, चंद्रशेखर नाईक, अभिषेक मराठे, मंजु आर्कसाली, संदीप रायकर, प्रकाश शहापूरकर, बाळू मिराशी, प्रकाश श्रेयेकर, श्रेयांश कदम, अक्षय शहापूरकर, लालू बाडीवाले, लक्ष्मण सोनटकी, महादेव दळवी, प्रकाश इंगळे, गजानन तुडवेकर, रविकुमार कम्मार, शंकरप्पा हिरगुप्पी, श्री. खन्नूकर, सिद्धू संबरगी, विजय पाटील यांच्यासह मंडळाच्या इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

thirteen + twelve =

error: Content is protected !!