बेळगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे औचित्य साधून भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ रोजी वरेरकर नाट्य मंदिर, टिळकवाडी, बेळगाव येथे ही स्पर्धा पार पडणार आहे.
विद्यार्थ्यांमधील व्यासपीठावरील धैर्य आणि आत्मविश्वास वाढविणे, वक्तृत्वकला जोपासणे तसेच आपले विचार प्रभावीपणे श्रोत्यांसमोर मांडण्याची क्षमता विकसित करणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. ही स्पर्धा प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन अशा तीन गटांत आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेचे गट आणि विषय पुढीलप्रमाणे :
प्राथमिक गट (इयत्ता चौथी ते सातवी)
- मोबाईल गेम की मैदानी खेळ?
- माझी प्रेरणा : छत्रपती शिवाजी महाराज
- मी शिक्षणमंत्री झालो/झाले तर?
- मातृभाषेतून शिक्षण : काळाची गरज
माध्यमिक गट (इयत्ता आठवी ते दहावी)
- मोबाईल स्मार्टफोन : मानवाचा सेवक की मालक?
- शेती आणि शेतकऱ्यांपुढील आव्हाने
- मराठी भाषा टिकविण्यासाठी माझे योगदान
- पर्यावरण संवर्धन : आजची गरज, उद्याची जबाबदारी
महाविद्यालयीन गट (इयत्ता अकरावी ते पदव्युत्तर)
- कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) : काळाची गरज की भविष्यातील धोका?
- जेन-झी आंदोलन : नव्या काळातील क्रांती?
- मराठी भाषा संवर्धन : युवकांची भूमिका
- डिजिटल भारत : संधी, आव्हाने आणि भविष्य
प्रत्येक स्पर्धकाला संबंधित गटातील वरील चार विषयांपैकी एका विषयाची निवड करावी लागणार आहे. विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र, मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी शनिवार, दिनांक १० ऑक्टोबर २०२६ पर्यंत युवा समिती कार्यालय, टिळकवाडी, बेळगाव येथे किंवा समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून नावनोंदणी करावी. प्रत्येक गटासाठी पहिल्या ३० स्पर्धकांनाच प्रवेश देण्यात येणार असल्याने इच्छुकांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
नावनोंदणीसाठी संपर्क :
- श्रीकांत कदम : 7019668025
- प्रतीक पाटील : 7338145673
- आशिष कोचेरी : 9886103373
अधिक माहितीसाठी : अध्यक्ष अंकुश केसरकर : 9739963229
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव यांच्या वतीने विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी होऊन आपले वक्तृत्वकौशल्य सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
