बेधडक बेळगाव वृत्तसेवा | बेळगाव
मराठा समाज सुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी प्रकाश मरगाळे तर कार्याध्यक्षपदी शिवराज पाटील यांची फेरनिवड करण्यात आली आहे. शहापूर येथील मेलगे गल्लीमधील मंडळाच्या वास्तूत आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेत सन २०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रकाश मरगाळे होते. सभेत मंडळाच्या पुढील वाटचालीसाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये उपाध्यक्षपदी के. एल. मजूकर, सरचिटणीसपदी संग्राम गोडसे, सहचिटणीसपदी राजू पावले, तर खजिनदारपदी प्रकाश गडकरी यांची निवड करण्यात आली.
नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
- अध्यक्ष : प्रकाश मरगाळे
- कार्याध्यक्ष : शिवराज पाटील
- उपाध्यक्ष : के. एल. मजूकर
- सरचिटणीस : संग्राम गोडसे
- सहचिटणीस : राजू पावले
- खजिनदार : प्रकाश गडकरी
कार्यकारिणी सदस्य : रघुनाथ बाडगी, सुरेंद्र जाधव, ईश्वर लगाडे (वधू-वर मंडळ प्रमुख), दत्तात्रय जाधव, शितल वेसणे, महेश जुवेकर, प्रा. नीता पाटील (महिला विभाग प्रमुख), विनोद आंबेवाडकर आणि उमेश पाटील.
नूतन कार्यकारिणीच्या निवडीमुळे मराठा समाज सुधारणा मंडळाच्या आगामी सामाजिक व संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
