बेळगाव : बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशन अँड स्पोर्ट्स यांच्या वतीने आणि मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेश उत्सव महामंडळ, बेळगाव यांच्या सहकार्याने आयोजित ‘2nd जय गणेश श्री 2026’ जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा 23 सप्टेंबर रोजी मराठा मंदिर, रेल्वे ओव्हरब्रिजजवळ, बेळगाव येथे उत्साहात पार पडली.
स्पर्धेत बेळगाव जिल्ह्यातील विविध जिम व फिटनेस सेंटरमधील शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग घेतला. 55, 60, 65, 70, 75, 80 आणि 80 किलोवरील अशा वजन गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक गटातील स्पर्धकांनी आपल्या दमदार शरीरयष्टीचे आणि पोझिंगचे सादरीकरण करत उपस्थितांची दाद मिळवली.
रोनक गावस ‘जय गणेश श्री 2026’चा मानकरी
स्पर्धेतील सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या ‘जय गणेश श्री 2026’ या मुख्य किताबावर Burn Outचा रोनक गावस याने नाव कोरले. SSS Foundationचा पंकज गुरव उपविजेता ठरला.
तसेच Best Poserचा मान उमेश गंगणे – Flex Gym याला मिळाला.
55 किलो गट
- तुकाराम गौडा – OMS Fitness
- कृष्णा हिरोजी – SSS Foundation
- रोहित सापळे – Flex Gym
- पांडुरंग गुरव – Flex Khanapur
- इरफान इराणी – Akash Gym
60 किलो गट
- ऋषिकेश बेळवकर – V. Sub…
- तेजस जाधव – Raw Fit
- ऋषभ गोवेकर – Burn Out
- दिनेश मादर – Flex Gym
- प्रितम कोळकर – Morya Gym
65 किलो गट
- पंकज गुरव – SSS Foundation
- ओंकार गावस – Burn Out
- कैफ हवालदार – Body Power
- अनिल बोहरा – Flex Gym, Khanapur
- राजू रेळेकर – Morya Gym
70 किलो गट
- रोनक गावस – Burn Out
- तेजस जाधव – SRS Fitness
- सतीश जाधव – Flex Khanapur
- उमर कंचीगार – Flex Gym
- श्रेयस येळजी – Corporation Gym
75 किलो गट
- पवन सावंत – Ball Rock Fitness
- मनीष सांब्रेकर – Hanuman Talim
- प्रशांत देवकी – Raw Fit
- श्रीराम पिलाणकर – Corporation Gym
- संजय बस्तवाडकर – Mense Fit
80 किलो गट
- शुभम बिसे – Strength Gym
- कार्तिक उपाशी – Tronden Gym
- यलगौडा पाटील – Flex Gym
- राहुल पाटील – Core Fitness
- दर्शन पाटील – Morya Gym
80 किलोवरील गट
- हर्षद पाटील – Raw Fit
- यश भोसले – Gold Gym
- सिद्धार्थ गावडे – Flex Gym
Men’s Physique Top-10 निकाल
- मारुती पाटील – Flex Khanapur Fitness
- ओंकार गावस – Burn Out
- मनीष सांब्रेकर – Hanuman Talim
- तेजस जाधव – SRS Fitness
- इरफान इराणी – Akash Gym
- तेजस जाधव – Raw Fit
- अदनान बालेकुंद्री – V Shape
- सुबन दोडवाड – Flex Gym
- माऊली गावडे – Flex Khanapur
- अजिंक्य शिंदे – Raw Fit
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रमाकांत कोंडूसकर, डॉ. संजय सुंठकर, अनिल बेनके, अनिल सुरेश कदम (मुंबई), परमिंदर खुराणी, सागर पाटील, कृष्णा कुरणे, किशोर गवस, लक्ष्मण येळलुरकर, दयानंद कदम, बसनगौडा पाटील, आनंद आपटेकर, मिस्टर इंडिया रणजित किल्लेकर आणि प्रीतम चौगुले उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षण करण्याची जबाबदारी राजेश लोहार, अनिल आंबरोळे, रणजित किल्लेकर, विजय चौगुले, विनोद मेत्री, बाबू पावशे, भरत बाळेकुंद्री, चेतन तशिलदार, सुनील चौधरी, श्रीधर बारटक्के आणि सोमनाथ हालगेकर यांनी पंच म्हणून पार पाडली.
स्टेज मार्शल म्हणून राजू पाटील आणि दीपक कोन्नूर यांनी काम पाहिले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सुतार यांनी केले.
स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके, चषक, पदके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. आयोजकांच्या वतीने सहभागी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात आले.
शरीरसौष्ठवपटूंच्या दमदार सादरीकरणामुळे जय गणेश श्री 2026 स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या जिल्हास्तरीय स्पर्धेमुळे बेळगावच्या शरीरसौष्ठव क्षेत्रातील खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले.
