जायंट्स सप्ताहानिमित्त न्यु गर्ल्स हायस्कूलमध्ये उत्साहात भालाफेक स्पर्धा

जायंट्स सप्ताहानिमित्त न्यु गर्ल्स हायस्कूलमध्ये उत्साहात भालाफेक स्पर्धा

बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या वतीने आयोजित जायंट्स सप्ताहानिमित्त न्यु गर्ल्स हायस्कूल येथे भालाफेक स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आपले क्रीडा कौशल्य दाखविले.

स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या स्पर्धकांना जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे अध्यक्ष व आयोजक प्रसिद्ध इंजिनियर श्री. शांताराम गोवेकर यांच्या हस्ते मोमेंटो देऊन गौरविण्यात आले.

तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती रुजविणे आणि त्यांच्या क्रीडा गुणांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. जायंट्स सप्ताहानिमित्त आयोजित या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

13 − 7 =

error: Content is protected !!