जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या उत्कृष्ट गणेशमूर्ती व देखावा स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या उत्कृष्ट गणेशमूर्ती व देखावा स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘उत्कृष्ट गणेश मूर्ती’ आणि ‘उत्कृष्ट देखावा’ स्पर्धेचा निकाल जाहीर करून पारितोषिक वितरण व सांगता सोहळा मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडला.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या स्पर्धेला शहरातील गणेश मंडळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील तब्बल ५६ गणेश मंडळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. सहभागी मंडळांच्या गणेशमूर्ती, सजावट आणि देखाव्याचे परीक्षण परीक्षकांकडून करण्यात आले.

स्पर्धेचे निकाल उत्तर आणि दक्षिण अशा दोन विभागांमध्ये जाहीर करण्यात आले. दोन्ही विभागांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मंडळांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची पारितोषिके प्रदान करण्यात आली. उत्तर विभागातील ६ आणि दक्षिण विभागातील ६ अशा एकूण १२ मंडळांना भव्य ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. तसेच उल्लेखनीय सादरीकरण आणि विशेष प्रयत्न करणाऱ्या ४ मंडळांना उत्तेजनार्थ ट्रॉफी देण्यात आल्या.

पारितोषिक वितरण सोहळ्यास विजेत्या मंडळांचे प्रतिनिधी तसेच सहभागी झालेल्या गणेश मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेशोत्सवातील कलात्मकता, सामाजिक सहभाग आणि मंडळांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनने राबविलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

या प्रसंगी जायंट्स मेनचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे, फेडरेशन डायरेक्टर शिवकुमार हिरेमठ, फेडरेशन ऑफिसर सुनील मुतगेकर, कोऑर्डिनेटर अशोक हलगेकर, माजी अध्यक्ष शिवराज पाटील, सुनील भोसले, सचिव विश्वास पवार, उपाध्यक्ष अरुण काळे, मधु बेळगांवकर यांच्यासह जायंट्सचे बहुसंख्य सदस्य आणि विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

गणेशोत्सवाच्या उत्साहात पार पडलेल्या या सोहळ्याने मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये नव्या उत्साहाची भावना निर्माण झाली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × 1 =

error: Content is protected !!