उचगाव फाटा येथे जायंट्स ग्रुप बेळगाव मेनतर्फे नूतनीकरण केलेल्या बस शेल्टरचे उद्घाटन

उचगाव फाटा येथे जायंट्स ग्रुप बेळगाव मेनतर्फे नूतनीकरण केलेल्या बस शेल्टरचे उद्घाटन

बेळगाव : उचगाव फाटा येथे मोडकळीस आलेल्या बस शेल्टरचे जायंट्स ग्रुप बेळगाव मेनतर्फे नूतनीकरण करण्यात आले असून, नव्याने सुसज्ज करण्यात आलेल्या या बस शेल्टरचे उद्घाटन उत्साहात पार पडले.

रविवार, ९ ऑगस्ट रोजी तरुण भारतमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची तात्काळ दखल घेत जायंट्स ग्रुप बेळगाव मेनने सामाजिक बांधिलकी जपत हे काम हाती घेतले. सुमारे आठ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले बस शेल्टर अत्यंत मोडकळीस आले होते. पत्रे उडून गेले होते, खांब निखळले होते तसेच प्रवाशांसाठी बसण्याची व्यवस्था देखील उपलब्ध नव्हती. त्यामुळे पावसाळ्यात प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती.

जायंट्स ग्रुपतर्फे बस शेल्टरचे नवीन फ्लोअरिंग व काँक्रीटीकरण, मजबूत लोखंडी व लाकडी सांगाडा, नवीन छत तसेच प्रवाशांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना आता सुरक्षित आणि आरामदायी निवारा उपलब्ध झाला आहे.

या कामासाठी जायंट्स ग्रुप बेळगाव मेनचे उपाध्यक्ष मधु बेळगावकर यांनी पूर्णपणे पुढाकार घेत नूतनीकरणाचे काम हाती घेतले ,त्यांना उचगाव ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, बीओडी सदस्य भास्कर कदम यांच्यासह इतर सदस्यांनी योगदान दिले.

नूतनीकरण केलेल्या बस शेल्टरचे उद्घाटन उचगाव ग्रामपंचायत उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे आणि जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जायंट्स ग्रुपचे उपाध्यक्ष मधु बेळगावकर, अरुण काळे, फेडरेशन ऑफिसर सुनील मुतगेकर, को-ऑर्डिनेटर अशोक हलगेकर, तसेच बीओडी सदस्य वाय. एन. पाटील, पुंडलिक पावसे, प्रदीप चव्हाण, महेश शाहपूरकर, विजय बनसुर, संजय पाटील, दयानंद भेंडीगिरी आदी उपस्थित होते.

तसेच उचगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य बंटी पावसे, गजानन नाईक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twenty − 17 =

error: Content is protected !!