माजी सैनिकांसाठी ४ ऑक्टोबरला बेळगावात ईएसएम रॅली व रोजगार मेळावा

माजी सैनिकांसाठी ४ ऑक्टोबरला बेळगावात ईएसएम रॅली व रोजगार मेळावा

बेळगाव : माजी सैनिक, वीर नारी आणि त्यांच्या आश्रितांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मराठा लाईट इन्फंट्री रेकॉर्ड्स यांच्या वतीने ४ ऑक्टोबर २०२६ रोजी बेळगावात ESM Rally & Job Fair 2026 आयोजित करण्यात आला आहे.

मुख्यालय दक्षिण भारत क्षेत्राच्या मार्गदर्शनाखाली मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथील शिवाजी स्टेडियमवर हा कार्यक्रम होणार आहे. या रॅलीला सुमारे २ हजार जणांची उपस्थिती अपेक्षित असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्याचा उद्देश माजी सैनिक, वीर नारी आणि त्यांच्या आश्रितांना नामांकित कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्या (MNCs) तसेच विविध संस्थांमधील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. महाराष्ट्र, कर्नाटक तसेच देशभरातील कंपन्यांना या मेळाव्यात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

यासाठी मराठा लाईट इन्फंट्रीचे ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय यांनी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष स्वप्नील साहा यांना पत्र पाठवून त्यांच्या नेटवर्कमधील नामांकित कंपन्यांना रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले आहे.

तसेच इच्छुक कंपन्यांनी आपल्या रिक्त पदांची माहिती आधीच जाहीर करावी, जेणेकरून योग्य उमेदवारांची निवड व शॉर्टलिस्टिंग करता येईल, अशी विनंती करण्यात आली आहे. सहभागी कंपन्यांना ४ ऑक्टोबरपूर्वीच उमेदवारांच्या स्क्रीनिंगची प्रक्रिया सुरू करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमामुळे देशसेवा केलेल्या माजी सैनिक, वीर नारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना रोजगाराच्या नव्या संधी मिळण्यास मदत होणार आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

14 − 7 =

error: Content is protected !!