मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ८१,८२० रुपये जप्त, १७ जण ताब्यात

मटका अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ८१,८२० रुपये जप्त, १७ जण ताब्यात

बेळगाव : शहरातील वडगाव परिसरात सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर सीसीबी विभागाच्या पथकाने छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत १७ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, ८१ हजार ८२० रुपयांची रोकड तसेच मटका व ओसीच्या आकड्यांच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या.

दिनांक ११ सप्टेंबर २०२६ रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीबी विभागाचे पीआय मंजुनाथ नायक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. वडगाव येथील कळमेश्वर रोडवरील शाहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका घरात मटका जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला.

छाप्यावेळी मटका जुगारात सहभागी असलेल्या १७ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ₹81,820 रोख रक्कम आणि ओसीच्या आकड्यांची नोंद असलेल्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या.

या प्रकरणी शाहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 128/2026, कलम 79, 80 कर्नाटक पोलीस कायदा 1963 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या कारवाईबद्दल सीसीबी विभागाचे पीआय मंजुनाथ नायक, पीएसआय मंजुनाथ भजंत्री आणि त्यांच्या पथकाच्या कार्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × 1 =

error: Content is protected !!