गणेश चतुर्थीनिमित्त बंगळुरू–बेळगावदरम्यान विशेष रेल्वे गाड्या

गणेश चतुर्थीनिमित्त बंगळुरू–बेळगावदरम्यान विशेष रेल्वे गाड्या

बेधडक बेळगाव वृत्तसेवा : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण पश्चिम रेल्वेने बंगळुरू (एसएमव्हीटी) आणि बेळगावदरम्यान दोन विशेष एक्स्प्रेस गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. या विशेष गाड्यांमुळे गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पहिली विशेष फेरी

गाडी क्रमांक 06563 एसएमव्हीटी बंगळुरूहून 11 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता सुटून 12 सप्टेंबर रोजी सकाळी 8.25 वाजता बेळगावला पोहोचेल.

परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 06564 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता बेळगावहून सुटून 13 सप्टेंबर रोजी पहाटे 5 वाजता बंगळुरूला पोहोचेल.

दुसरी विशेष फेरी

गाडी क्रमांक 06583 एसएमव्हीटी बंगळुरूहून 13 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता सुटून 14 सप्टेंबर रोजी सकाळी 8.25 वाजता बेळगावला दाखल होईल.

परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 06584 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता बेळगावहून सुटून 15 सप्टेंबर रोजी पहाटे 5 वाजता बंगळुरूला पोहोचेल.

महत्त्वाचे थांबे

या विशेष गाड्या चिकबनावर, तुमकूर, अरसीकेरे, बिरूर, दावणगेरे, हरिहर, हावेरी, हुबळी, धारवाड, अलनावर, लोंढा आणि खानापूर या स्थानकांवर थांबणार आहेत.

20 डब्यांची रचना

विशेष गाड्यांमध्ये एकूण 20 डबे असणार असून त्यामध्ये फर्स्ट एसी, एसी 2-टियर, एसी 3-टियर, स्लीपर, जनरल सेकंड क्लास तसेच एसएलआरडी डब्यांचा समावेश आहे.

गणेशोत्सवाच्या काळात बेळगाव आणि बंगळुरूदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या विशेष गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन दक्षिण पश्चिम रेल्वेकडून करण्यात आले आहे.

Headline :
गणेश चतुर्थीनिमित्त बंगळुरू–बेळगावदरम्यान दोन विशेष रेल्वे गाड्या; प्रवाशांना मोठा दिलासा

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

12 + 20 =

error: Content is protected !!