बेळगाव : श्री श्रीधर स्वामी क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा 20 ऑगस्ट 2026 रोजी न्यू उदय भवन येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन श्री. आनंद जोशी होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राजेंद्र जोशी यांनी केले. सभेच्या प्रारंभी उपस्थित सभासदांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मागील वर्षाच्या वार्षिक अहवालाचे वाचन करण्यात आले. चालू आर्थिक वर्षातील ताळेबंद तसेच नफा-तोटा पत्रक सभेपुढे मांडण्यात आले असून त्यास सभासदांनी मंजुरी दिली.
यावेळी संस्थेच्या नवीन ऑडिटरची नियुक्ती करण्यात आली तसेच लाभांशाचा दरही जाहीर करण्यात आला. सभासदांच्या पाल्यांनी शैक्षणिक क्षेत्रात विशेष गुणवत्ता प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
सभासदांनी विविध सूचना मांडल्या. त्यामध्ये सैनिकांना मदत करण्याबाबत तसेच संस्थेची नवीन शाखा सुरू करण्याबाबतच्या सूचनांचा समावेश होता. या सर्व सूचनांचा गांभीर्याने विचार करण्यात येईल आणि त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे चेअरमन श्री. आनंद जोशी यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
सभेचे कामकाज खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. यावेळी संस्थेचे अनेक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे संचालक श्री. आनंद अध्यापक यांनी उपस्थितांचे आभार मानले.
