बेळगाव: बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन अँड स्पोर्ट्सची वार्षिक सभा क्लब रोड येथील डॉ. संजय अण्णा सुंठकर यांच्या कार्यालयात उत्साहात पार पडली. या सभेत आगामी ‘जय गणेश श्री-2026’ शरीरसौष्ठव स्पर्धेची अधिकृत घोषणा करण्यात आली.
स्पर्धेतील ‘जय गणेश श्री-2026’ किताब विजेत्यास SSS फाउंडेशनतर्फे २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले. तसेच चेतन ताशिलदार यांनी किताब विजेत्यास सायकल भेट देण्याची घोषणा केली.
यावेळी श्री. मल्लेश अण्णा चौगुले यांनी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात जिल्हास्तरीय ‘जय भीम क्लासिक ट्रॉफी’ शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले.
सभेदरम्यान संघटनेचा जमा-खर्चाचा अहवाल वाचून दाखविण्यात आला असून उपस्थित सदस्यांनी त्यास एकमताने मंजुरी दिली. तसेच संघटनेच्या वर्षभरातील कामकाजाचा आढावा अनिल अंबारोळे यांनी सादर केला.
या वार्षिक सभेला मल्लेश चौगुले, विकास कलघटगी, डॉ. संजय अण्णा सुंठकर, महेश सातपुते, अनिल अंबारोळे, राजेश लोहार, रणजित किल्लेकर, नारायण चौगुले, चेतन ताशिलदार, विजय चौगुले, श्रीधर बारटक्के, भारत बाळे कुंद्री, सुनील बोकडे, बाबू पावशे, दीपक हलगेकर, प्रवीण कणबरकर यांच्यासह जिल्ह्यातील अनेक व्यायामपटू उपस्थित होते.
