बेळगाव : उद्योजकांमध्ये परस्पर सहकार्य, नेटवर्किंग आणि व्यवसायवृद्धीला चालना देण्याच्या उद्देशाने **Saturday Club Global Trust (SCGT)**च्या Belgav Chapter आणि Gadhinglaj Region यांच्या वतीने ‘Grand Visitor Day’ आणि ‘Business Presentation’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत क्लब रोड, चन्नम्मा सर्कलजवळील Hotel EEFA येथे होणार आहे. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी डिनरचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सहभागींसाठी Business Formal असा ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे.
SCGT ही उद्योजकांच्या व्यवसायवृद्धीसाठी आणि मजबूत व्यावसायिक नेटवर्किंगसाठी कार्यरत संस्था असून, संस्थापक स्वर्गीय श्री. माधवराव भिडे यांच्या ‘एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत’ या विचारातून संस्थेचे कार्य सुरू आहे.
कार्यक्रमात Mr. Sachin Jadhav (SV Mind Logic – Nipani Chapter / Cross Chapter) आणि Mr. Abhiishek J Gavii (Gavii Groups – Belgav Chapter / Home Chapter) हे प्रमुख वक्ते व प्रस्तुतीकर्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.
बेळगावातील व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाला नवी दिशा देण्यासोबतच विविध व्यावसायिकांशी संपर्क वाढविण्याची आणि मोठ्या मार्केटिंग प्लॅटफॉर्मचा भाग होण्याची संधी या कार्यक्रमातून मिळणार आहे.
कार्यक्रमासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी Rohan Kundekar – Chairperson (SOM Wealth & Financial Solutions) यांच्याशी 9900845456 किंवा Prathamesh S Karekar – Secretary (S.D. Karekar Jewellers) यांच्याशी 9741766465 या क्रमांकावर संपर्क साधावा.
