बेळगाव पोलीस आयुक्तपदी प्रकाश निकम; भूषण बोरसे यांची हुबळी-धारवाडला बदली

बेळगाव पोलीस आयुक्तपदी प्रकाश निकम; भूषण बोरसे यांची हुबळी-धारवाडला बदली

बेळगाव : राज्य शासनाने बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची बदली केली असून, त्यांची नियुक्ती हुबळी-धारवाड पोलीस आयुक्तपदी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी २०१२ बॅचचे आयपीएस अधिकारी प्रकाश निकम यांची बेळगावच्या नव्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भूषण बोरसे यांनी बेळगाव पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असताना शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासह विविध संवेदनशील प्रश्नांवर काम केले. भाषिक, जातीय आणि धार्मिक सलोखा कायम ठेवण्यासाठीही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या अचानक झालेल्या बदलीमुळे प्रशासकीय व राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.

दरम्यान, नवे पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांना बेळगावचा पूर्वीचाही अनुभव आहे. त्यांनी यापूर्वी बेळगाव ग्रामीण भागात प्रोबेशनरी आयपीएस अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यामुळे बेळगावची सामाजिक व भौगोलिक परिस्थिती तसेच स्थानिक आव्हानांची त्यांना चांगली माहिती आहे.

नवीन पोलीस आयुक्त म्हणून प्रकाश निकम यांच्यासमोर शहरातील कायदा व सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्था, गुन्हेगारीवर नियंत्रण आणि नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक मजबूत करण्याचे आव्हान असणार आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × 3 =

error: Content is protected !!