उद्यमबाग पोलिसांची कारवाई; १ किलो २१२ ग्रॅम गांजासह तरुणाला अटक

उद्यमबाग पोलिसांची कारवाई; १ किलो २१२ ग्रॅम गांजासह तरुणाला अटक

बेळगाव : गांजाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या एका तरुणाला उद्यमबाग पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून १ किलो २१२ ग्रॅम गांजा, मोबाईल, रोख रक्कम आणि मोटारसायकल असा एकूण १ लाख ३ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सागर सुरेश मोरे (वय २९) असून तो हिंदवाडी, उद्यमबाग परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी उद्यमबाग पोलिसांना गांजा विक्रीबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. यावेळी आरोपीकडून ६० हजार रुपये किमतीचा १ किलो २१२ ग्रॅम गांजा, ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल, ३१० रुपये रोख आणि ३५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी उद्यमबाग पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८०/२०२६ अंतर्गत एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम २०(बी)(ii)(बी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई उद्यमबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महांतेश व्ही. होसपेठी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहभागी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × five =

error: Content is protected !!