खानापूर : श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी खानापूर येथील मलप्रभा नदीतून पवित्र जल घेऊन कावड यात्रा काढण्यात आली. या पवित्र जलाने वैजनाथ मंदिरातील शिवलिंगावर अभिषेक करण्यात येईल.
श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा हा धार्मिक उपक्रम सलग तीन वर्षांपासून श्रद्धेने सुरू आहे. मलप्रभा नदीचे पाणी कावडीमधून घेऊन भाविकांनी वैजनाथ मंदिरात आणले आणि विधिवत पूजा-अर्चा करून भगवान शिवाचा जलाभिषेक करण्यात येईल
यात्रे दरम्यान हिंडलगा येथील मिलिटरी विनायक मंदिर येथे यात्रकरूंनी दर्शन घेऊन यात्रा वैजनाथाच्या दिशेने रवाना झाले.
या कावड यात्रेत प्रदीप मुंगळीकर, कल्लाप्पा पाटील, गोविंद पाटील, नितीन बेनके, मनोहर पिसाळे, बाळू मुंगळीकर, आर्यन पाटील, आदर्श मुंगळीकर, मारुती गडकर, नितीन पाटील, श्रीधर बेनके, यल्लाप्पा जाधव, गणपत चव्हाण यांच्यासह बेनकनहळ्ळी येथील भाविक सहभागी झाले. तसेच महेश कनबरकर (आंबेवाडी) यांनीही यात्रेत सहभाग घेतला.
श्रावण महिन्यातील या धार्मिक उपक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. भाविकांनी श्रद्धेने सहभागी होत भगवान वैजनाथाचे दर्शन घेतील.
