स्वातंत्र्य दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक सोसायटीत देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम

स्वातंत्र्य दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक सोसायटीत देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम

बेळगाव : बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्राच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सोमवारपेठ, टिळकवाडी येथील डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात डॉ. बी. जी. शिंदे व सहकाऱ्यांनी देशभक्तीपर गीतांची सादरीकरणे केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष विश्वास धुराजी होते. यावेळी कार्यवाह सुरेंद्र देसाई, उपाध्यक्ष के. एल. मजूकर व सहकार्यवाह शिवराज पाटील उपस्थित होते.

डॉ. बी. जी. शिंदे यांच्यासह शशिकांत शिंदे, कृष्णा इंदूलकर, विजयमाला पाटील आणि अश्विनी पाटील यांनी विविध स्फूर्तीदायी देशभक्तीपर गीते सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. विजय वाईगडे यांनी प्रार्थना सादर केली. वसंत पाटील, जगमोहन अगरवाल, रवींद्र कुंभोजकर, स्वाती माने आणि डॉ. मालतेश पाटील यांनी मराठी, हिंदी व कन्नड भाषेतील देशभक्तीपर गीते सादर केली. वनिता जोशी यांनी बहारदार नृत्य सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.

यावेळी एल. व्ही. सलगर, इराण्णा हलगी, विनायक वेलगी आणि सिद्धाप्पा देसाई यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचा समारोप के. एल. मजूकर यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × 5 =

error: Content is protected !!