बेळगाव : बेळगाव ऑटोमोबाईल मर्चंट्स असोसिएशन (BAMA)तर्फे भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन फोर्ट रोड येथील असोसिएशनच्या कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ऑटोमोबाईल क्षेत्रातील व्यापारी व असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ओमप्रकाश वैष्णव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. BAMAचे अध्यक्ष शरद पाटील आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.
यानंतर असोसिएशनच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी ऑटोमोबाईल व्यापाऱ्यांना व्यवसाय करताना भेडसावणाऱ्या विविध छोट्या-मोठ्या अडचणी तसेच भविष्यातील व्यवसायवाढीच्या संधींबाबत चर्चा करण्यात आली.
BAMAचे अध्यक्ष शरद पाटील यांनी सरकारी अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून व्यापाऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी झालेल्या कामांचा आढावा घेतला. बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी तसेच व्यापाऱ्यांच्या समस्या ऐकून त्या सोडविण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले.
ऑटोमोबाईल व्यापाऱ्यांना व्यवसाय चालविताना कोणतीही अडचण आल्यास BAMA त्यांच्या पाठीशी राहील आणि संबंधित समस्या सोडविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही अध्यक्ष शरद पाटील यांनी दिली.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जबाबदारी स्वीकारल्याबद्दल BAMAतर्फे समर्थ खुडे यांचे विशेष आभार मानण्यात आले.
यावेळी BAMAचे अध्यक्ष शरद पी. पाटील, सचिव कमरुद्दीन सौदागर, माजी अध्यक्ष फिरोज खान, माजी सचिव मनजीतसिंग कोहली, वहाब, अमजद, सुहास पाटील, शाम धामणे, विल्सन, शंभू, गोपाल प्रजापत, विशाल पाटील, संजय मासेकर, अरुण तापस्कर यांच्यासह ऑटोमोबाईल क्षेत्रातील व्यापारी व पदाधिकारी उपस्थित होते.
