बेळगाव : इन्सुलिनवर उपचार घेत असलेल्या एका महिला मधुमेही रुग्णेच्या हातावरील गंभीर आणि दीर्घकाळ न भरून येणाऱ्या जखमेवर प्रगत जर्मन होमिओपॅथिक उपचारांद्वारे लक्षणीय सुधारणा झाल्याचा दावा Advanced German Homoeopathic Clinicचे डॉ. मनोज एस. पुजार (एमडी होमिओपॅथी) यांनी केला आहे.
रुग्णेच्या हातावरील जखम मधुमेहामुळे गंभीर स्वरूपाची झाली होती. दीर्घकाळ उपचार करूनही जखम अपेक्षित प्रमाणात भरून येत नसल्याने शस्त्रक्रियेद्वारे स्किन ग्राफ्टिंग (त्वचा प्रत्यारोपण) करण्याचा सल्ला देण्यात आला होता.
मात्र, संबंधित रुग्णेवर Advanced German Homoeopathic Treatment अंतर्गत उपचार करण्यात आले. यासोबतच नियमित तपासणी आणि आवश्यक जखम व्यवस्थापन करण्यात आले. त्यानंतर जखमेत लक्षणीय सुधारणा होत ती पूर्णपणे भरून आली आणि स्किन ग्राफ्टिंगची आवश्यकता राहिली नाही, असे डॉ. पुजार यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी मधुमेही रुग्णांनी शरीरावरील कोणतीही जखम दुर्लक्षित करू नये, असे आवाहन केले. मधुमेहामुळे जखमा उशिरा भरून येण्याची शक्यता असल्याने त्यांचे वेळेवर निदान, योग्य उपचार आणि नियमित वैद्यकीय देखरेख अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
(टीप : वरील माहिती संबंधित डॉक्टरांनी दिलेल्या दाव्यावर आधारित आहे.)
