बनशंकरी महिला मंडळाच्या आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शंभर नागरिकांनी घेतला लाभ

बनशंकरी महिला मंडळाच्या आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शंभर नागरिकांनी घेतला लाभ

पिरणवाडी : बनशंकरी महिला मंडळ, पिरणवाडी यांच्या वतीने विनायक नगर येथील विनायक मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शुक्रवार (दि. ७ ऑगस्ट) रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत झालेल्या या शिबिराचा सुमारे १०० नागरिकांनी लाभ घेतला.

शिबिरात सामान्य आरोग्य तपासणीसह रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, कावीळ, अर्धांगवायू, दमा, यकृताचे आजार, मूत्रपिंडाचे विकार, हाडे व सांध्यांचे विकार, थायरॉईड, त्वचारोग, मूळव्याध तसेच बालरोग, स्त्रीरोग आणि क्षयरोग यांसंबंधी तपासण्या करण्यात आल्या. यासोबतच नेत्र तपासणी करून आवश्यक उपचार व पुढील वैद्यकीय सल्लाही देण्यात आला.

या शिबिरात डॉ. अग्रवाल नेत्रदर्शन यांच्या वतीने श्री. उदयकुमार, श्रीमती श्रीदेवी (ऑप्टोमेट्रिस्ट) आणि श्री. नरेंद्र बिर्जे (तंत्रज्ञ) यांनी नेत्र तपासणी सेवा दिली. तसेच आदिवीर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मच्छे येथील डॉ. पद्मराज पाटील, डॉ. विद्या पी. पाटील, डॉ. नवाज मुल्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी बनशंकरी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. जयश्री यल्लप्पा मिरजी, सचिव वैशाली लक्ष्मण हुल्लोळी, सदस्य यल्लव्वा कलसप्पान्नावर, साधना शिवाजी साकळकर आणि मेघा संतोष नौकुडकर यांच्यासह मंडळाच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच समाजसेविका माधुरी जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याबद्दल आयोजकांनी त्यांचे आभार मानले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twelve + 10 =

error: Content is protected !!