बंगळूर : कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डर्स (KABB) ची २०२५-२६ वर्षासाठीची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी अरोळी फार्म्स, फार्म स्टे, कनकपूरा रोड, बंगळूर येथे उत्साहात पार पडली.
सभेत संघटनेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. तसेच आगामी वर्षातील स्पर्धा, बॉडी बिल्डिंगच्या विकासासाठीचे उपक्रम, खेळाडूंचे प्रोत्साहन आणि संघटनात्मक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या सभेला श्री जे. नीलकंठ, डॉ. जी. डी. भट्ट, श्री दिलीप कुमार, श्री अजित सिद्धन्नावर, श्री शंकर पिल्ले, श्री हरीश, श्री उमा महेश, श्री किशोर कुमार, श्री गंगाधर, श्री मेहबूब सी., श्री आसिफ इक्बाल कुसुगल, श्री जॉन्सन ए. डिसोझा, श्री राघवेंद्र, श्री योगेश, श्री रवी गौडा, श्री एम. डी. सलीम गौर आणि श्री अनीस अहमद दलाल यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
सभेचा समारोप कर्नाटकातील बॉडी बिल्डिंग खेळाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करून करण्यात आला.
