निपाणी : निपाणी नगरपालिकेचे आयुक्त गणपती पाटील यांनी गुरुवारी दुपारी २.३० वाजता नगरपालिका प्रशासन अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत, तसेच चिकोडी प्रांताधिकाऱ्यांनी प्लॉट विक्रीला स्थगिती (स्टे) दिलेल्या सर्व्हे नं. 190B (1 व 2) मधील लेआऊटची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी संबंधित लेआऊटची संपूर्ण माहिती घेऊन अधिकाऱ्यांना आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच लवकरच चिकोडी एडीएलआर (ADLR) कार्यालयामार्फत संपूर्ण लेआऊटची अधिकृत मोजणी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
लेआऊटची पाहणी करताना आयुक्त गणपती पाटील यांनी निपाणी–मुरगूड मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था लक्षात घेऊन त्या ठिकाणी तात्पुरता मुरूम टाकून रस्ता सुस्थितीत करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या पाहणीमुळे लेआऊटसंदर्भातील प्रशासकीय कारवाईला वेग येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
– फोर जेआर ह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशन
