महाराष्ट्र एकीकरण युवा समितीकडून कुप्पटगिरी मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीकडून कुप्पटगिरी मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

बेळगाव | प्रतिनिधी

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील कुप्पटगिरी मराठी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते शरद पाटील यांनी मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा टिकेल, असे सांगत मराठी शाळा वाचविण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले. ग्रामपंचायत सदस्या सी.ए. पद्मश्री पाटील यांनी युवा समितीच्या उपक्रमाचे आणि कार्यकर्त्यांच्या योगदानाचे कौतुक केले.

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती गेल्या नऊ वर्षांपासून सीमाभागातील मातृभाषेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करत आहे. मराठी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

या प्रसंगी विद्यार्थ्यांना अंकलिपी पुस्तिका, वह्या, पेन, पेन्सिल किट तसेच इतर शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाला शाळा सुधारणा समितीचे पदाधिकारी, शिक्षक, ग्रामस्थ तसेच महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे खानापूर व बेळगाव येथील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18 − seventeen =

error: Content is protected !!