टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेट परिसरातील ड्रेनेज समस्येवर अखेर तोडगा

बेळगाव : टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेट परिसरातील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ड्रेनेज समस्येवर अखेर कायमस्वरूपी तोडगा निघाला असून, नवीन ड्रेनेज लाईन जोडण्याचे काम पूर्ण झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या परिसरात ड्रेनेजची समस्या गंभीर बनली होती. दूषित पाणी विहिरींमध्ये मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. वारंवार तक्रारी करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती.

नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत नगरसेवक आनंद चव्हाण यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि नवीन ड्रेनेज लाईन जोडण्याचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे दीर्घकाळापासून भेडसावणाऱ्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय झाल्याचे सांगण्यात आले.

या कामामुळे परिसरातील ड्रेनेज व्यवस्था सुधारण्यास मदत होणार असून दूषित विहिरींचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त करत संबंधित लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे आभार मानले आहेत.

English Slug: टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेट परिसरातील ड्रेनेज समस्येवर अखेर तोडगा

बेळगाव : टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेट परिसरातील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ड्रेनेज समस्येवर अखेर कायमस्वरूपी तोडगा निघाला असून, नवीन ड्रेनेज लाईन जोडण्याचे काम पूर्ण झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या परिसरात ड्रेनेजची समस्या गंभीर बनली होती. दूषित पाणी विहिरींमध्ये मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. वारंवार तक्रारी करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती.

नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत नगरसेवक आनंद चव्हाण यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवीन ड्रेनेज लाईन जोडण्याचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे दीर्घकाळापासून भेडसावणाऱ्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय झाल्याचे सांगण्यात आले.

या कामामुळे परिसरातील ड्रेनेज व्यवस्था सुधारण्यास मदत होणार असून दूषित विहिरींचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात सुटण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त करत संबंधित लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे आभार मानले आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

9 + 10 =

error: Content is protected !!