शांताई वृद्धाश्रमाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन; डीसीपी नारायण भारमणी यांची उपस्थिती

शांताई वृद्धाश्रमाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन; डीसीपी नारायण भारमणी यांची उपस्थिती

बेळगाव: गेल्या २८ वर्षांपासून निराधार व ज्येष्ठ नागरिकांची निःस्वार्थ सेवा करणाऱ्या शांताई वृद्धाश्रम (सेकंड चाइल्डहूड) या संस्थेच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन सौ. कस्तुरी नारायण भारमणी यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी शहराचे डीसीपी नारायण भारमणी प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना डीसीपी नारायण भारमणी यांनी शांताई वृद्धाश्रमाने गेल्या २८ वर्षांपासून ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी केलेल्या कार्याचे कौतुक केले. निराधार वृद्धांना निवारा, अन्न, प्रेमळ कुटुंबाचे वातावरण आणि आवश्यक सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देणारे हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी माजी महापौर विजय मोरे यांनी बेळगाव शहराच्या विकासासाठी आणि सामाजिक कार्यासाठी दिलेल्या योगदानाचाही गौरव केला.

कार्यक्रमादरम्यान शांताई वृद्धाश्रमातील आजी-आजोबांनी डीसीपी नारायण भारमणी आणि सौ. कस्तुरी भारमणी यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

या कार्यक्रमास वृद्धाश्रमातील सर्व आजी-आजोबा उपस्थित होते. तसेच विजय पाटील, मारिया मोरे, विजय कोटी, ॲलन विजय मोरे, संतोष मामदापूर, प्रसाद म्हैसूर, उमेश कळघटगी यांच्यासह अनेक मान्यवर, हितचिंतक आणि संस्थेचे समर्थक उपस्थित होते.

नव्या कार्यालयाच्या उद्घाटनामुळे शांताई वृद्धाश्रमाच्या सेवाकार्यात आणखी बळ मिळणार असून, ज्येष्ठ नागरिकांना सन्मान, प्रेम आणि सुरक्षित वातावरण देण्याचा संस्थेचा २८ वर्षांचा सेवाव्रताचा प्रवास अधिक सक्षमपणे पुढे सुरू राहणार आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nine − 9 =

error: Content is protected !!