अवैध घुसखोरांविरोधात तपास मोहीम राबविण्याची मागणी; हमारा देश संघटनेचे पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन

अवैध घुसखोरांविरोधात तपास मोहीम राबविण्याची मागणी; हमारा देश संघटनेचे पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन

बेळगाव : शहरात अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास मोहीम राबवावी, अशी मागणी हमारा देश संघटनेच्या वतीने शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि जिल्हा पोलीस प्रमुख रामरंजन यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दोन्ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली. काही दिवसांपूर्वी बेंगळुरू येथे पोलिसांनी अवैधरित्या भारतात प्रवेश केलेल्या २७० बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. त्यानंतर १५ जुलै रोजी मंगळुरूमधील एका बांधकाम प्रकल्पावर काम करणाऱ्या ११ बांगलादेशी नागरिकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यातील बागेपल्ली येथे एका पाकिस्तानी महिला व तिच्या मुलालाही अटक करण्यात आल्याच्या घटनांचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर बेळगावसह इतर शहरांमध्येही अवैधरीत्या वास्तव्य करणारे परदेशी नागरिक असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पोलिसांनी विशेष तपास मोहीम राबवावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

निवेदनात बांधकाम, हॉटेल, कारखाने, सराफ व्यवसाय तसेच इतर आस्थापनांमध्ये बाहेरून येणाऱ्या कामगारांची नियुक्ती करण्यापूर्वी त्यांची कागदपत्रे पोलीस पडताळणीद्वारे तपासून ते भारतीय नागरिक असल्याची खात्री करण्याची व्यवस्था करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

या निवेदनाच्या प्रती केंद्रीय गृह मंत्रालय, कर्नाटक राज्य गृह विभाग तसेच कर्नाटक राज्य पोलीस महासंचालक यांनाही पाठविण्यात आल्याची माहिती संघटनेने दिली. तसेच या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि कामगार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार असून, या विषयाबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीही केली जाणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.

यावेळी संघटनेच्या महिला कार्यकर्त्या आसावरी भोकरे, सविता नायक, शुभांगी झेंडे, विशाखा ओझा तसेच प्रशांत राणे, मोहन कुऱ्याळकर, बसवराज हुसमणी, मुकेश वेर्णेकर, लक्ष्मीकांत कोटगी आणि सम्राट गोडसे उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twenty + 12 =

error: Content is protected !!