बेळगाव: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे सचिव संकेत आर्सेकर यांनी आज बेळगावातील शांताई वृद्धाश्रम (सेकंड चाइल्डहूड) येथे सदिच्छा भेट दिली.
यावेळी संकेत आर्सेकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या वतीने वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक आणि व्यवस्थापनाला शुभेच्छा दिल्या. तसेच वृद्धाश्रमातील ज्येष्ठांशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची व विचारपूस केली.
या भेटीदरम्यान सावर्डे ग्रामपंचायतीचे सरपंच शशिकांत नाईक, उत्तर गोवा युवा उपाध्यक्ष गुणाजी मांद्रेकर, साईश नाईक, गौरेश राऊत आणि सतीश हे उपस्थित होते.
माजी महापौर विजय मोरे यांनी संकेत आर्सेकर व त्यांच्या शिष्टमंडळाचे स्वागत केले. उपस्थित मान्यवरांनी शांताई वृद्धाश्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी दिली जाणारी सेवा, काळजी आणि समर्पित कार्याचे कौतुक करत संस्थेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
