बनावट IGPA तयार करून मालमत्ता नोंदणी प्रकरणी दोघांना अटक

बनावट IGPA तयार करून मालमत्ता नोंदणी प्रकरणी दोघांना अटक

बेळगाव : बनावट IGPA (Irrevocable General Power of Attorney) तयार करून उपनोंदणी कार्यालयात मालमत्तेची बेकायदेशीर नोंदणी केल्याप्रकरणी मार्केट पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

या प्रकरणात इसाक इस्माईल मुजावर (वय 43, रा. न्यू आझाद नगर, बेळगाव) आणि नागराज रामचंद्र कडकोळ (वय 41, व्यवसाय – रिअल इस्टेट, रा. देवराज अरस कॉलनी, बसवण कुडची, बेळगाव) यांना 18 जुलै 2026 रोजी अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 जानेवारी 2025 रोजी कडोली येथील परशुराम देवप्पा दुदुम (वय 66) यांनी मार्केट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा क्रमांक 02/2025 अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 464, 465, 467, 468, 471, 419 सह 149 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

तपासादरम्यान आरोपींनी तक्रारदाराच्या मालमत्तेवर डोळा ठेवून बनावट व्यक्ती उभी केली. तिचा फोटो व बनावट स्वाक्षरी वापरून खोटी IGPA तयार करण्यात आली आणि त्याच्या आधारे उपनोंदणी कार्यालयात मालमत्तेची नोंदणी करून फसवणूक करण्यात आल्याचे उघड झाले.

तपासादरम्यान बनावट IGPA वरील छायाचित्राच्या आधारे मुख्य आरोपी इसाक मुजावर याची ओळख पटली. त्यानंतर त्याच्यासह या कटात सहभागी असलेल्या नागराज कडकोळ यालाही अटक करण्यात आली.

दरम्यान, आरोपी नागराज कडकोळ याच्याविरुद्ध उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोला पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 64/2026 (BNS 2023 अंतर्गत विविध कलमे) नोंद असून, त्या प्रकरणात तो यापूर्वी कारागृहातून जामिनावर बाहेर आल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

ही कारवाई मार्केट पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्झा, पीएसआय एच. एल. केरूर व त्यांच्या पथकाने केली. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी त्यांचे कौतुक केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen − 3 =

error: Content is protected !!