उत्कर्ष महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम; मोफत नेत्रतपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

उत्कर्ष महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम; मोफत नेत्रतपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

बेळगाव: नागरिकांच्या नेत्रआरोग्याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने उत्कर्ष महिला मंडळातर्फे गुरुवार, दि. १६ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेले मोफत नेत्रतपासणी शिबिर उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडले. या शिबिरात मोठ्या संख्येने महिला व नागरिकांनी सहभागी होत मोफत नेत्रतपासणीचा लाभ घेतला.

शिबिराच्या अध्यक्षस्थानी मंडळाच्या अध्यक्षा सौ. शुभांगी पाटील या होत्या, तर प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका सारिका पाटील उपस्थित होत्या. प्रख्यात नेत्रचिकित्सक डॉ. नूतन कंगराळकर यांच्या नेतृत्वाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यांनी उपस्थितांची सखोल नेत्रतपासणी करून डोळ्यांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. नियमित नेत्रतपासणीचे महत्त्व, डोळ्यांची योग्य काळजी आणि नेत्रविकारांपासून बचावासाठी आवश्यक उपाययोजनांची माहितीही त्यांनी दिली.

या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाच्या सचिव शिवानी पाटील, उपाध्यक्षा चंदा घाडी तसेच हेमलता कानशिडे, प्रेमा तमुचे आणि वनिता पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांनी उत्कर्ष महिला मंडळाच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशा आरोग्यविषयक शिबिरांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

16 + 19 =

error: Content is protected !!