कॅम्प पोलीस ठाणे नव्या ठिकाणी स्थलांतरित; नागरिकांनी नव्या कार्यालयातच संपर्क साधावा

कॅम्प पोलीस ठाणे नव्या ठिकाणी स्थलांतरित; नागरिकांनी नव्या कार्यालयातच संपर्क साधावा

बेळगाव, दि. २९ जून:
बेळगाव शहरातील हाय स्ट्रीट, बी.सी. क्रमांक ९७ येथे कार्यरत असलेले कॅम्प पोलीस ठाणे हे २९ जून २०२६ पासून अधिकृतपणे बीएसएनएल इमारत, ग्लोब थिएटर समोर येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.

जुनी इमारत संरचनात्मकदृष्ट्या असुरक्षित झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून, यापुढे सर्व पोलीस सेवांसाठी नागरिकांनी नव्या ठिकाणी असलेल्या कॅम्प पोलीस ठाण्यातच संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.

पोलीस प्रशासनाने नागरिकांना या बदलाची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

महत्त्वाचे संपर्क क्रमांक :

  • पोलीस निरीक्षक : 9480804051
  • कॅम्प पोलीस ठाणे : 0831-2405234
  • कंट्रोल रूम : 0831-2405278 / 33
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × 2 =

error: Content is protected !!