योगामुळे आरोग्य स्वस्थ व सुंदर राहते – विजय बन्सुर

योगामुळे आरोग्य स्वस्थ व सुंदर राहते – विजय बन्सुर

संजीवीनी फाउंडेशनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

बेळगाव : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संजीवीनी फाउंडेशनमध्ये योगासन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात योग शिक्षक विजय बन्सुर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून योगाचे महत्त्व विशद केले.

यावेळी बोलताना विजय बन्सुर म्हणाले की, नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहते. योगामुळे शरीर निरोगी, तंदुरुस्त आणि सुंदर राहण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करणे आवश्यक आहे. त्यांनी योगाचे विविध प्रकार, विविध आसनांचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम तसेच मानसिक शांतता आणि एकाग्रता वाढविण्यात योगाची भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

गेल्या ३० वर्षांपासून नियमित योगाभ्यास करत असल्यामुळे आजही आपण तंदुरुस्त व तरुण असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान काळजी केंद्रातील रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना विविध योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली तसेच त्यांच्याकडूनही योगासने करून घेण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अर्चना शिरहट्टी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अक्षता अक्कोळे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. संजीवीनी फाउंडेशनचे चेअरमन मदन बामणे यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे विजय बन्सुर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकिता सूर्यवंशी यांनी केले, तर सरिता सिद्दी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन राठोड, बसम्मा बेनकट्टी आणि बिस्टव्वा नाईक यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × two =

error: Content is protected !!