गोकाकच्या श्री महालक्ष्मी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट बँकेचा परवाना रद्द

गोकाकच्या श्री महालक्ष्मी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट बँकेचा परवाना रद्द

बेळगाव : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गोकाक येथील श्री महालक्ष्मी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट बँक लिमिटेडचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. 16 जून 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार बँकेला 18 जून 2026 रोजी कामकाज बंद झाल्यानंतर कोणतेही बँकिंग व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली आहे.

आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बँकेकडे पुरेसे भांडवल आणि उत्पन्नाची क्षमता नसल्याने तसेच बँकिंग नियमन कायदा, 1949 मधील विविध तरतुदींचे पालन करण्यात अपयश आल्याने हा निर्णय घेण्यात आला. बँकेची सद्यस्थिती ठेवीदारांचे हित जपण्यासाठी सक्षम नसल्याचेही आरबीआयने नमूद केले आहे.

परवाना रद्द केल्यानंतर कर्नाटकच्या सहकार निबंधकांना बँक बंद करण्याची प्रक्रिया सुरू करून लिक्विडेटर नियुक्त करण्याची विनंती करण्यात आली आहे.

आरबीआयच्या माहितीनुसार, बँकेच्या लिक्विडेशननंतर प्रत्येक ठेवीदाराला डीआयसीजीसी (DICGC) मार्फत जास्तीत जास्त ₹5 लाखांपर्यंतच्या ठेवी विमा संरक्षणाचा लाभ मिळणार आहे. बँकेने सादर केलेल्या आकडेवारीनुसार सुमारे 97.90 टक्के ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम मिळण्यास पात्रता आहे.

तसेच 9 जून 2026 पर्यंत डीआयसीजीसीने संबंधित ठेवीदारांच्या संमतीनुसार एकूण विमा संरक्षित ठेवींमधील ₹88.21 कोटींची रक्कम आधीच अदा केल्याची माहिती देण्यात आली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × four =

error: Content is protected !!