गांजा विक्रीप्रकरणी कारवाई; ₹1.85 लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक

गांजा विक्रीप्रकरणी कारवाई; ₹1.85 लाखांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक

बेळगाव : शहर गुन्हे शाखेच्या (CCB) पथकाने गांजा विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या एका संशयितावर धाड टाकून सुमारे ₹1.85 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 जून 2026 रोजी मृत्युञ्जय भीमसेप्पा जडगी (वय 19, रा. यल्लापूर, ता. हुक्केरी) हा आरोपी दुसऱ्या आरोपीकडून गांजा घेऊन विक्रीसाठी आणत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंजुनाथ भजंत्री व त्यांच्या पथकाने करीकट्टी क्रॉस, भीमगड-गोकाक मार्गावर सापळा रचून कारवाई केली.

या कारवाईत आरोपीकडून 3 किलो गांजा जप्त करण्यात आला. त्याची किंमत सुमारे ₹1.50 लाख असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय ₹30 हजार किमतीची बजाज प्लॅटिना दुचाकी, एक व्हिवो मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ₹1.85 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी मारिहाळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 83/2026 अंतर्गत एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, ही यशस्वी कारवाई करणाऱ्या सीसीबीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × four =

error: Content is protected !!