बेननस्मिथ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्समध्ये चित्रकार चंद्रशेखर रांगणेकर यांची चित्रकला कार्यशाळा

बेननस्मिथ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्समध्ये चित्रकार चंद्रशेखर रांगणेकर यांची चित्रकला कार्यशाळा

बेळगाव, दि. ६ जून : बेननस्मिथ कॉलेज ऑफ फाइन आर्ट्सतर्फे बेळगावचे प्रसिद्ध चित्रकार चंद्रशेखर रांगणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला महाविद्यालयाच्या प्राचार्या वृंदा चेन तसेच आर्ट अफेअर्स मासिकाचे अक्षय बापट यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी अक्षय बापट यांनी विद्यार्थ्यांना कला प्रदर्शने, संग्रहालये तसेच कलाक्षेत्रातील विविध करिअर संधींबाबत मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी चंद्रशेखर रांगणेकर यांच्या कलाप्रवासाची आणि त्यांच्या उल्लेखनीय कलाकृतींची माहिती देत विद्यार्थ्यांना प्रेरित केले.

कार्यशाळेदरम्यान चंद्रशेखर रांगणेकर यांनी लाईव्ह डेमोद्वारे चित्रनिर्मितीची संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांसमोर सादर केली. कलाकृती घडविताना आवश्यक असलेली एकाग्रता, सातत्य, निरीक्षणशक्ती आणि सर्जनशीलतेचे महत्त्व त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.

या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना अनुभवी कलाकाराच्या कार्यपद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची आणि विविध कलामाध्यमांतील कामांविषयी जाणून घेण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांनी रांगणेकर यांचे प्रात्यक्षिक उत्सुकतेने पाहत त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तरांचे सत्र आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यशाळेला कला शाखेतील अनेक विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × 4 =

error: Content is protected !!