मोटारसायकल चोरीप्रकरणी एकाला अटक; पाच दुचाकी जप्त

मोटारसायकल चोरीप्रकरणी एकाला अटक; पाच दुचाकी जप्त

बेळगाव, दि. 2 जून 2026: बेळगाव पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या प्रकरणाचा यशस्वी छडा लावत एकाला अटक केली आहे. या कारवाईत सुमारे ₹2.55 लाख किमतीच्या पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

हिरेबागेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत 1 जून 2026 रोजी नोंद झालेल्या मोटारसायकल चोरीच्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला होता. तपासादरम्यान संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली.

अटक करण्यात आलेला आरोपी श्री लक्ष्मण विरुपक्षी कणबर्गी (वय 31), रा. आडीवेप्पण अंकलागी, एम मल्लापुर रोड तालुका गोकाक , जि .बेळगाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याने बेळगाव शहर आणि परिसरातून विविध ठिकाणांहून मोटारसायकली चोरल्याची माहिती तपासात समोर आली आहे. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या दुचाकींची एकूण किंमत सुमारे ₹2,55,000 असल्याचे पोलिसांनी नमूद केले.

ही कारवाई हिरेबागेवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने केली. पोलिस अधीक्षक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी मोहीम राबविण्यात आली.

या कामगिरीबद्दल पोलिस पथकाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले असून पुढील तपास सुरू आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × one =

error: Content is protected !!