माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री स्व. सुरेश अंगडी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री स्व. सुरेश अंगडी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

बेळगाव : माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा साधी, विनम्र आणि जनसामान्यांशी नाळ जपणारे लोकप्रिय नेते स्वर्गीय सुरेश अंगडी यांच्या जयंतीनिमित्त आज कित्तूर राणी चन्नम्मा चौक येथील श्री गणेश मंदिरात विशेष प्रार्थना करण्यात आली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. सुरेश अंगडी यांच्या कार्याचा गौरवपूर्ण स्मरण करताना कर्नाटकाच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि अथक प्रयत्नांमुळे राज्यात अनेक विकासकामे मार्गी लागली असून, विशेषतः रेल्वे आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती.

या प्रसंगी माजी खासदार सौ. मंगला अंगडी, खासदार जगदीश शेट्टर, राजन जाधव, अनुप काटे, इरय्या खोता, हनमंत कागलकर, चेतना अंगडी, संजय भंडारी, राहुल मुचंडी, विजय भद्र, नागराज पाटील, मुक्तार पठाण, सविता करडी, अॅड. महावीर राज पाटील यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्व. सुरेश अंगडी यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या आदर्शांवर चालण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

6 − one =

error: Content is protected !!