RCBचा सलग दुसऱ्यांदा IPL किताबावर कब्जा; गुजरात टायटन्सवर 5 विकेट्सनी मात

RCBचा सलग दुसऱ्यांदा IPL किताबावर कब्जा; गुजरात टायटन्सवर 5 विकेट्सनी मात

अहमदाबाद : आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने गुजरात टायटन्सवर 5 विकेट्सनी शानदार विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावले. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात RCB ने दमदार कामगिरी करत चाहत्यांना जल्लोषाची संधी दिली.

प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने 20 षटकांत 8 बाद 155 धावा केल्या. प्रत्युत्तरात RCB ने 18 षटकांत 5 विकेट्स गमावत 161 धावा पूर्ण करून विजेतेपद आपल्या नावावर केले.

RCB कडून विराट कोहलीने 42 चेंडूत शानदार 75 धावांची खेळी साकारत विजयात मोलाचा वाटा उचलला. कर्णधार रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली RCB ने पुन्हा एकदा IPL ट्रॉफी उंचावली.

RCB च्या विजयामुळे बंगळुरूसह देशभरातील चाहत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

14 + 11 =

error: Content is protected !!