मराठी विभागाच्यावतीने सोमवारी ‘दशावतार’ नाटकाचे आयोजन

मराठी विभागाच्यावतीने सोमवारी ‘दशावतार’ नाटकाचे आयोजन

बेळगाव, दि. 24 मे : राणी चन्नमा विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे आणि श्री बोर्डेकर पारंपारिक दशावतार नाट्यमंडळ, दोडामार्ग (जि. सिंधुदुर्ग) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दशावतार’ या लोकनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवार, दि. 25 मे रोजी सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत कोनवाळ गल्ली येथील रिझ थिएटरमध्ये होणार आहे.

संगीत, कला आणि लोकसंस्कृतीची समृद्ध परंपरा लाभलेल्या बेळगाव शहरात मराठी नाटकांची उज्ज्वल परंपरा आहे. याच परंपरेला पुढे नेत मराठी विभागाच्यावतीने लोककलेवर आधारित ‘दशावतार’ हे वैशिष्ट्यपूर्ण नाटक रसिकांसाठी सादर करण्यात येत आहे.

या नाटकात दिलीप सामंत, विनोद परब, विजय वाडकर, संजय मोर्ये, अंकुश गरुड, सुधीर परब, प्रसाद मेस्त्री, संजय पराडकर, नारायण मालवणकर आणि दीपक नार्वेकर हे कलाकार विविध भूमिका साकारत आहेत.

संगीतसाथीसाठी रामचंद्र परब (हार्मोनियम), गणेश मेस्त्री (पखवाज) तसेच सचिन पालकर (तालरक्षक) यांचे योगदान लाभणार आहे.

नाट्यरसिकांनी या लोककलेचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

तिकीट व अधिक माहितीसाठी संपर्क :

  • अशोक आलगोंडी – 90353 85923
  • सतीश जाधव – 96633 25614
  • महादेव खोत – 96068 80849
  • संतोष मादकाई – 80953 81097

‘दशावतार’च्या माध्यमातून पारंपरिक लोककलेचा वारसा जपण्याचा आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 − 4 =

error: Content is protected !!