जात प्रमाणपत्रातील चुकीच्या नोंदीविरोधात नामदेव शिंपी समाजाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

जात प्रमाणपत्रातील चुकीच्या नोंदीविरोधात नामदेव शिंपी समाजाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

बेळगाव :बेळगाव खडेबाझार येथील श्री नामदेव दैवकी संस्था यांच्या वतीने नामदेव शिंपी समाजातील व्यक्तीच्या जात प्रमाणपत्रात चुकीची नोंद करण्यात आल्याच्या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून भविष्यात अशा प्रकारच्या चुका टाळाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनानुसार, समाजातील सदस्य अद्विक सुजीत खटावकर यांनी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला असता, त्यांच्या मूळ समाज व धार्मिक ओळखीविरोधात चुकीची माहिती नोंदविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. नामदेव शिंपी समाजातील व्यक्तीची नोंद चुकून “मुस्लिम” अशी करण्यात आल्याने समाजामध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

संस्थेने म्हटले आहे की, जात प्रमाणपत्र हे शिक्षण, नोकरी, शासकीय योजना आणि सामाजिक ओळख यासाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज असून अशा त्रुटींमुळे संबंधित व्यक्तीच्या भवितव्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात संबंधित व्यक्तीचे जात प्रमाणपत्र तात्काळ दुरुस्त करून योग्य प्रमाणपत्र देणे, या प्रकरणाची सखोल चौकशी करणे, जबाबदार अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणे तसेच भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी सर्व तालुका कार्यालयांना स्पष्ट सूचना देण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी बेळगाव शहरासह शहापूर परिसर आणि आजूबाजूच्या भागातील नामदेव शिंपी समाजाचे अनेक समाजबांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18 − twelve =

error: Content is protected !!