जातीच्या दाखल्यातील चुकीविरोधात नामदेव दैवकी संस्थेचा निषेध; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार

जातीच्या दाखल्यातील चुकीविरोधात नामदेव दैवकी संस्थेचा निषेध; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार

बेळगाव : जातीच्या दाखल्यामध्ये चुकीचा उल्लेख झाल्याच्या घटनेविरोधात नामदेव दैवकी संस्थेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असून, या प्रकरणात संबंधित भगिनीला न्याय मिळवून देण्यासाठी समाजबांधवांनी एकत्र यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेळगावातील समाजातील एका भगिनीने जातीचा दाखला मिळविण्यासाठी अर्ज केला होता. मात्र संबंधित दाखल्यामध्ये त्यांच्या जातीचा उल्लेख “मुस्लिम शिंपी” असा करण्यात आल्याने समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या अशा चुकीमुळे समाजबांधवांना मानसिक त्रास व नुकसान सहन करावे लागत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर नामदेव दैवकी संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. यासाठी बेळगाव शहरातील सर्व समाजबांधव, महिला मंडळ, भगिनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेने केले आहे.

ही बैठक शुक्रवार दिनांक 15 रोजी दुपारी 12 वाजता खडे बाजार येथील श्री संत शिरोमणी नामदेव मंदिर येथे आयोजित करण्यात आली आहे.

संस्थेचे अध्यक्ष रोहण उरणकर आणि सेक्रेटरी शशिकांत हावळ यांनी सर्व समाजबांधवांनी एकजुटीने उपस्थित राहून संबंधित भगिनीला न्याय मिळवून देण्यासाठी पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen + 20 =

error: Content is protected !!