अनगोळ परिसरात परवानगीशिवाय डॉल्बी लावल्याप्रकरणी टिळकवाडी पोलिस विभागाची कारवाई

अनगोळ परिसरात परवानगीशिवाय डॉल्बी लावल्याप्रकरणी टिळकवाडी पोलिस विभागाची कारवाई

बेळगावातील अनगोळ परिसरात विवाह कार्यक्रमादरम्यान परवानगीशिवाय डॉल्बी साउंड सिस्टम वापरून ध्वनीप्रदूषण केल्याप्रकरणी टिळकवाडी पोलिस विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ६ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक रस्त्यावर मोठ्या आवाजात साउंड सिस्टम लावून नागरिकांना त्रास होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर टिळकवाडी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

चौकशीत संबंधितांनी डॉल्बी साउंड सिस्टम वापरण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र परिसरात ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्तींना त्रास होण्याची शक्यता लक्षात घेऊन परवानगी नाकारण्यात आल्याचे समोर आले. तरीदेखील नियमांचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात साउंड सिस्टम सुरू ठेवण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.

या प्रकरणी टिळकवाडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम २९२, १२५ सह कलम ३(५) तसेच कर्नाटक पोलिस कायदा १९६३ अंतर्गत कलम ३७ सह कलम १० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

सार्वजनिक अथवा खासगी कार्यक्रम आयोजित करताना संबंधित विभागांची आवश्यक परवानगी घेणे तसेच ध्वनीप्रदूषण नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन टिळकवाडी पोलिस विभागाकडून करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × two =

error: Content is protected !!