मुचंडी येथे श्री महालक्ष्मी देवी व श्री मरगाई देवी यात्रोत्सवाला १२ मेपासून प्रारंभ

मुचंडी येथे श्री महालक्ष्मी देवी व श्री मरगाई देवी यात्रोत्सवाला १२ मेपासून प्रारंभ

बेळगाव तालुक्यातील मुचंडी येथे तब्बल ३० वर्षांनंतर श्री महालक्ष्मी देवी व श्री मरगाई देवी यांचा यात्रोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात आयोजित करण्यात आला आहे. हा यात्रोत्सव ९ दिवस चालणार असून ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मंगळवार दि. १२ मे २०२६ रोजी सूर्योदयासमयी सकाळी ६.०७ वाजता अक्षतारोपण होणार आहे. त्यानंतर सकाळी ७ वाजता होम-हवन कार्यक्रम पार पडणार आहे. सकाळी ८ वाजता देवस्थान पंच कमिटी व हक्कदारांच्या वतीने देवींची ओटी भरल्यानंतर सकाळी १० वाजल्यापासून ग्रामस्थांच्या वतीने देवींची ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे.

यात्रोत्सव काळात विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच बुधवार दि. २० मे २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता देवींची महाआरती झाल्यानंतर यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.

या यात्रोत्सवासाठी भाविकांनी सहकुटुंब, सहपरिवार व मित्रमंडळीसह उपस्थित राहून श्री महालक्ष्मी देवी व श्री मरगाई देवींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18 + 19 =

error: Content is protected !!