बेळगावमध्ये गावठी दारू व अमलीपदार्थांवर आळा घालण्यासाठी संयुक्त कारवाईचे आदेश

बेळगावमध्ये गावठी दारू व अमलीपदार्थांवर आळा घालण्यासाठी संयुक्त कारवाईचे आदेश


बेळगाव : जिल्ह्यात गावठी दारू आणि अमलीपदार्थांची विक्री रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यासंदर्भात सर्व संबंधित विभागांना समन्वयाने काम करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

बुधवारी झालेल्या विविध खात्यांच्या स्थायी समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करताना, बेळगाव शहर व जिल्ह्यातील अबकारी विभागाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला. विशेषतः गावठी दारू व अमलीपदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस, अबकारी, वन, शिक्षण आणि इतर विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली स्थायी समिती स्थापन करण्यात आली आहे.

गावठी दारूच्या निर्मिती व विक्रीवर आळा घालण्यासाठी पोलीस, अबकारी आणि वन विभागाने संयुक्त मोहीम राबवून कठोर कारवाई करावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. याशिवाय, अबकारी विभागाने गेल्या वर्षभरात केलेल्या कारवाईचा आणि शासनाच्या महसुलात जमा झालेल्या कराचा आढावाही बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीला पोलीस उपायुक्त नारायण बरमणी, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख आर. बी. बसरगी, अबकारी विभागाचे जगदीश कुलकर्णी, स्वप्ना, एन. सी. पाटील, विजय हिरेमठ, रवी मुरगोड, शंकरगौडा यांच्यासह पोलीस, अबकारी, परिवहन, शिक्षण व वनविभागातील अधिकारी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twenty + 13 =

error: Content is protected !!