बेळगावात पोलीसांची कारवाई; रिव्हॉल्वरसह आरोपी ताब्यात

बेळगावात पोलीसांची कारवाई; रिव्हॉल्वरसह आरोपी ताब्यात


बेळगाव: शहरातील खडेबाजार पोलीसांनी धाडसी कारवाई करत एका आरोपीला रिव्हॉल्वरसह ताब्यात घेतले आहे. दिनांक 05.05.2026 रोजी आरोपी शंकर बसवराज बंडिवड्डर (रा. बेनचिनमर्डी, ता. गोकाक, जि. बेळगाव) हा कॉलेज रोड परिसरात सार्वजनिक ठिकाणी हातात रिव्हॉल्वर घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती.

या पार्श्वभूमीवर खडेबाजार पोलीस ठाण्याचे पीएसआय सुनील कन्निराम चव्हाण व त्यांच्या पथकाने तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक रिव्हॉल्वर जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी खडेबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 43/2026 अंतर्गत भारतीय दंड संहिता कलम 270 तसेच शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

या कारवाईबद्दल पोलीस आयुक्त तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाचे कौतुक केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × 3 =

error: Content is protected !!