मार्केंडय नगरमध्ये खाजगी प्लॉटवर कचरा टाकण्याचा प्रकार; नागरिक त्रस्त

मार्केंडय नगरमध्ये खाजगी प्लॉटवर कचरा टाकण्याचा प्रकार; नागरिक त्रस्त


बेळगाव: मार्केंडय नगर येथील रहिवाशांनी परिसरातील वाढत्या अस्वच्छतेबाबत गंभीर तक्रार केली आहे. येथील एका रिकाम्या खाजगी प्लॉटवर विविध कॉलनीमधील नागरिकांकडून दररोज प्लास्टिक तसेच बांधकामाचा कचरा टाकला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सदर कचऱ्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढली असून दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. रहिवाशांची घरे या ठिकाणाच्या अगदी जवळ असल्याने त्यांना याचा थेट त्रास सहन करावा लागत आहे.

महापालिकेकडे अनेक वेळा तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिकांनी प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी तसेच परिसरात योग्य कचरा व्यवस्थापनाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × five =

error: Content is protected !!